चोपडा : दोन ज्वेलर्स दुकान फोडण्याचा प्रयत्न, चोरटे सीसीटीव्हीत कैद

चोपडा : दोन ज्वेलर्स दुकान फोडण्याचा प्रयत्न, चोरटे सीसीटीव्हीत कैद
  • MG News
  • मे 14 2025

Share on  

 चोपडा : दोन ज्वेलर्स दुकान फोडण्याचा प्रयत्न, चोरटे सीसीटीव्हीत कैद

           चोपडा शहरातील मेन गल्लीत सोन्या-चांदीचे दुकाने मोठ्या प्रमाणावर आहे. मध्ये रात्री शहरातील मेन रोडवरील दोन ज्वेलर्स चे दुकान मोटरसायकलवर आलेले अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शर्टर तोडण्याचे प्रयत्न सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले आहे. ज्वेलर्स मध्ये चोरी झाली नसली, तरी दुकान फोडण्याचे प्रयत्न केले असल्याने सर्व ज्वेलर्स मालिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर घटनेची माहिती चोपडा शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी मधुकर साळवे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ आपल्या टीमच्या माध्यमातून शहरातील विविध भागात असलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासणी केली असतात काही कॅमेऱ्यांमध्ये चोरटे कैद झाले आहे. चोपडा शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी शोध घेत आहेत, लवकरच चोरटे पकडण्यात येईल, असे उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले. 
 

संबंधित बातम्या