चोपडा शहरातील गुजरअळी भागात शंकर राजपूत यांच्या निवासस्थानी विराजमान असलेल्या दशामाता मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्र महोत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा करण्यात येत आहे. या महोत्सवातील मुख्य आकर्षण असलेला दशामाता पालखी सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला.
या पालखी सोहळ्यात महिलांसोबतच पुरुष आणि तृतीयपंथीयांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. ढोल-ताशांच्या गजरात, जयघोष करत तृतीयपंथीयांनी ठेका धरत पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. शहरातून पालखी वाजतगाजत नेण्यात आली.
शहरातील नागरिक मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित होते. हे नवरात्र महोत्सवाचे नऊ दिवस संपूर्ण परिसरात भक्तिभाव, आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतं, असं खानदेशातील लोकप्रिय कलाकार रॉकी राजपूत यांनी सांगितलं.