सातारा वाई येथून पायी प्रवास करत मोर्चा मंत्रालयात निघाला असून, यात महिलांचा सहभाग लक्षणीय आहे.
आपल्या गावात चालणाऱ्या अनधिकृत क्वारी क्रशर बंद व्हावेत आणि हे बंद करण्यासाठी आम्ही केलेल्या आंदोलनात आमच्या मुला बाळांवर झालेले चुकीचे गुन्हे मागे घ्यावेत या मुख्य मागण्यांसाठी तब्बल तीनशे ते चारशे किलोमिटर पायी प्रवास करत संपूर्ण गाव निघाले आहे. यात वयोवृद्ध महिलांचाही मोठा सहभाग आहे.