भंडारा जिल्हा बँकेत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसच्या नाना पटोलेंना पुन्हा एकदा दोन दिवसातचं दुसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावं लागलं. आज झालेल्या भंडारा जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँगेस समर्थित पॅनलच्या उमेदवाराचा पराभव झाला. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप युतीचे विलास काटेखाये हे अध्यक्षपदी निवडून आलेत. १२ संचालकांपैकी काँग्रेसचा एक संचालक मतदानाच्या वेळी सभागृहात गैरहजर होता. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या सहकार संघटनेचे विलास काटेखाये यांना ६ मतं मिळाली. तर, काँग्रेसच्या उमेदवाराला ५ मतं मिळाली. दोन दिवसातचं काँग्रेसच्या नाना पटोलेंना दुसऱ्यांदा मोठ्या निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं.