जनसुरक्षा कायदा रद्द करण्यासाठी काँग्रेसकडून निदर्शने, तहसीलदारांना निवेदन

जनसुरक्षा कायदा रद्द करण्यासाठी काँग्रेसकडून निदर्शने, तहसीलदारांना निवेदन
  • MG News
  • जुलै 23 2025

Share on  

अर्बन नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी जनसुरक्षा कायदा आणल्याचा सरकारचा दावा अत्यंत हास्यास्पद आहे. हा कायदा आतून बाहेरून काळा असून सामान्यांची गळचेपी करणारा आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाचा सुरुवातीपासूनच त्याला विरोध आहे. सभागृहात सत्ताधारी पक्षाकडे बहुमत असल्याने त्यांनी बहुमताच्या जोरावर रेटून नेत कायदा मंजूर करून घेतलेला आहे.

सरकारने कायदा मंजूर करून घेतला असला तरी काँग्रेसचा विरोध कायम राहणार असून हा तत्काळ कायदा रद्द करावा अशी मागणी करीत शेगाव शहर व तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्षनेते रामविजय बुरुंगले आणि ज्ञानेश्वरदादा पातळ यांच्या नेतृत्वात निदर्शने करीत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

पक्षाच्या वतीने जनसुरक्षा कायद्यात विरोधी पक्षांनी काही सुधारणा सुचवल्या होत्या, परंतु त्या शासनाने नाकारल्या. याशिवाय, सुरक्षेसंदर्भातील गुन्ह्यांसाठी आधीपासूनच विविध कायदे अस्तित्वात असल्यामुळे नवीन कायद्याची आवश्यकता भासत नाही.

जनसुरक्षा कायदा लोकशाहीविरोधी स्वातंत्र्यावर गदा आणणारा असल्याचा आरोप तहसीलदारांना निवेदन देताना करण्यात आला. हा कायदा लोकशाहीविरोधी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. तहसीलदारांमार्फत राज्यपालांना निवेदन देण्यात आले.

संबंधित बातम्या