हवामान खात्याने ठाणे जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट दिल्यानंतर काल मध्यरात्रीपासूनच पावसाची सुरुवात ठाणे जिल्ह्यात झालेली आहे. परंतु भिवंडी शहर व ग्रामीण भागात मध्यरात्रीपासून पावसाची संतधर सुरू असली तरीसुद्धा त्यामध्ये पाहिजे तसा जोर नसल्याने रिमझिम पाऊस धारा सुरू आहेत. यामुळे शहरातील कुठल्याही सखल भागात पाणी साचलेलं आढळून आलेले नाही. परंतु शहराच्या सीमेवरून वाहणारी कामवारी नदी पात्रात पाणी पातळीत वाढ झालेली आहे. त्यामुळे कामवारी नदी दुधडी भरून वाहण्यास सुरुवात झाली आहे.
पावसाचा जोर सायंकाळ पर्यंत असाच कायम राहिल्यास नदीलगतच्या शहर व ग्रामीण भागातील म्हाडा कॉलनी, ईदगाह, शेलार या परिसरात पाणी भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.