निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीतील सालटेक गावच्या शिवारात GAIL & Tonado Solar कंपनीच्या प्रकल्पातून कॉपर केबल वायर चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
ही घटना दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 10.35 वाजता घडली होती. कंपनीच्या आय.सी.आर. क्र. 09 मधील ब्लॉक नं. 21 व आय.सी.आर. क्र. 1.3 मधील ब्लॉक नं. 47 मधून वायर चोरीस गेल्याने निजामपुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 283/2025 भा.दं.वि. कलम 331, 305, 3(5) प्रमाणे दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान पोलीसांनी संशयितांची चौकशी करून 1) नंदु नाना मारनर, 2) विठ्ठल खंडु मारनर, 3) संदिप मोतीराम वाघमोडे यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून ₹40,600 किमतीचा कॉपर केबल वायरचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे. इतर आरोपी देविदास बंडु थोरात व दादु लक्ष्मण मारनर यांच्या शोधासाठी पोलीसांचे पथक सक्रिय आहे.
ही कारवाई मा. श्रीकांत धिवरे (पोलीस अधीक्षक, धुळे), मा. किशोर काळे (अपर पोलीस अधीक्षक), मा. एस.आर. बांबळे (उपविभागीय पोलीस अधिकारी, साक्री) यांच्या मार्गदर्शनाखाली, सपोनि मयुर भामरे, पोउनि मधुकर सोमासे व निजामपुर पोलीस स्टेशनच्या पथकाने केली.
पथकातील अधिकारी व कर्मचारी:
यशवंत भामरे, चंद्रकांत गायकवाड, नारायण माळचे, रतन मोरे, प्रशांत ठाकुर, प्रदीप आखाडे, खंडेराव पवार, परमेश्वर चव्हाण, श्रीराम पदमर, शरद पाटील, मोहन माळी, मुकेश दुरगुडे, सुनिल अहिरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
निजामपुर पोलिसांच्या दक्ष तपासामुळे कॉपर चोरी प्रकरण उघडकीस येऊन आरोपींना अटक करण्यात यश आले आहे.