हत्येच्या गुन्ह्यातील आरोपीला तब्बल १३ वर्षांनी गुन्हे शाखेने केली अटक

हत्येच्या गुन्ह्यातील आरोपीला तब्बल १३ वर्षांनी गुन्हे शाखेने केली अटक
  • MG News
  • ऑगस्ट 2 2025

Share on  

रबाळे एमआयडीसी मध्ये २०१२ साली सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या एका ५० वर्षीय इसमाची अज्ञात व्यक्तीने छातीवर धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता आरोपीचा शोध लागत नव्हता. याप्रकरणी गुन्हे शाखेने सदर गुन्ह्याची कागदपत्र आणि आरोपीचे फोटो यावरून महिनाभरापासून पुन्हा तपास सुरु केला आणि खाजगी तसेच सरकारी यंत्रणेद्वारे प्राप्त माहितीच्या आधारे तब्बल तेरा वर्षांनी नागपूर येथे सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतले. आरोपी छोटू यादव याची अधिक चौकशी केली असता त्यानेच ही हत्या केल्याचे कबूल केले. मयत इसम हा नात्याने मामा लागत होता आणि पैशाच्या वादातून त्यांच्यात वाद झाला होता. पैसे मयत इसम देत नसल्याने आरोपी छोटू यादव याने धारदार शस्त्राने वार करत भावनखन यादव याची हत्या केल्याचे कबूल केले आहे. 
 

संबंधित बातम्या