चोपडा तालुक्यात अल्प पावसामुळे पिकांची वाढ खुंटली

चोपडा तालुक्यात अल्प पावसामुळे पिकांची वाढ खुंटली
  • MG News
  • ऑगस्ट 2 2025

Share on  

 चोपडा तालुक्यात जून महिन्यामध्ये पाऊस सुरू झाल्याने लोकांनी शेतात पेरणी केली. परंतु जुलै महिन्यामध्ये पावसाने खंड पाडल्याने शेतातील पिकांना पाण्याची आवश्यकता भासू लागले. पीक परिस्थिती धोक्यात आली होती. परंतु गेल्या दोन-तीन दिवसापासून तालुक्यातील काही भागांमध्ये रिपरिप कमी जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांसाठी फायदेशीर ठरला आहे. परंतु काही भागांमध्ये पावसाचे अल्प प्रमाणामुळे शेतातील पिकांची वाढ खुंटली. तर ढगाळ वातावरणामुळे मका, सोयाबीन, कापूस या पिकांवरती रोगाचा प्रादुर्भाव व अळी पडली आहे. यामुळे शेतकऱ्यांना फवारणीचा खर्च वाढला असल्याने त्याच बरोबर खत घेताना दुकानदारांकडून लिंकिंग दिली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक भुदंड बसत आहे. अशा पावसामुळे शेतातील पिकांना होणारा परिणामामुळे येणाऱ्या उत्पन्नात घट होणार आहे. शेतात पाहिजे त्या प्रमाणात ओलावा नसल्याने फक्त पिकांना जीवदान मिळेल, असा पाऊस पडत आहे. तालुक्यात जोरदार पावसाची अपेक्षा शेतकरी करताना दिसत आहे. 

संबंधित बातम्या