बॉलीवूड इंडस्ट्रीत नृत्यांगना म्हणून काम करणाऱ्या एका तरुणीवर बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आरे पोलिसांनी २२ वर्षीय नृत्य प्रशिक्षक आणि इव्हेंट ऑर्गनायझर असलेल्या तरुणाला एका ३२ वर्षीय व्यावसायिक नृत्यांगनेवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक केली आहे. सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेची तक्रार आता दाखल करण्यात आली आहे.
पीडिता अंधेरीत राहणारी असून ती चित्रपट व स्टेज शोमध्ये बॅकग्राऊंड नृत्यांगना म्हणून काम करते. आरोपी हा मालाडचा रहिवासी असून डान्स कोच व कार्यक्रम आयोजक आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर आरे पोलिसांनी भा.न्या.सं.च्या संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे.