देवळाली व्यापारी बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांचा राजीनामा : चोरडिया होणार अध्यक्ष

देवळाली व्यापारी बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांचा राजीनामा : चोरडिया होणार अध्यक्ष
  • MG News
  • ऑक्टोबर 8 2025

Share on  

देवळाली व्यापारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून लवकरच नवीन अध्यक्षाची निवड केली जाणार आहे.

जून 2023 मध्ये नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेची निवडणूक झाली होती या निवडणुकीत दत्ता गायकवाड निवृत्ती अरिंगळे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलने पूर्ण बहुमत मिळविले होते निवडणूक होण्यापूर्वी जैन समाजाने सहकार पॅनल ला पूर्ण पाठिंबा देऊन निवडणुकीनंतर जैन समाजाच्या संचालकाला चेअरमन पदाची संधी द्यावी अशी मागणी केली होती व त्याबाबत सहकार पॅनलचे नेते दत्ता गायकवाड व निवृत्ती अरींगळे यांनी तसे आश्वासन दिले होते. दरम्यान रोटेशन पद्धती नुसार गायकवाड यांची मुदत संपत आल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा गेल्या महिन्यात 25 तारखेला झालेल्या झालेल्या संचालकांच्या बैठकीत दिला होता. व नवीन अध्यक्ष निवडण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे. 

दरम्यान  अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा दत्ता गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केली. नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेत  माहेश्वरी व जैन समाजाचे तीन संचालक आहे त्यामध्ये सध्या उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर प्रशांत भुतडा हे काम बघत आहे तर जैन समाजाचे अशोक चोरडिया व सुनील चोपडा हे दोन संचालक आहे. या दोघांपैकी चोरडिया यांना अध्यक्षपदाचा मान मिळणार असल्याचे समजते.

या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरींगळे, जनसंपर्क संचालक अरुण जाधव तसेच मनोहर कोरडे, रमेश धोंगडे, सुधाकर जाधव, योगेश नागरे, वसंत अरिंगळे, विलास पेखळे, नितीन खोले, श्रीराम गायकवाड, गणेश खरजुल, रामदास सदाफुले, रंजना बोराडे, कमल आढाव, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सोनार तसेच एकनाथ कदम बँक कर्मचारी प्रतिनिधी यशवंत पागेरे मंगेश पडवळ आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या