कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचा विकास आराखडा सादर : मंत्री माधुरी मिसाळ
- कोल्हापूरच्या अंबाबाई आणि ज्योतिबा देवस्थानाच्या नव्या आराखड्याचे सादरीकरण आज सह पालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासमोर सादर करण्यात आले. हा नवा आराखडा राज्य सरकार समोर आला असून, या आराखड्यामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश आहे. याची माहिती आज मंत्री माधुरी मिसाळ यांनी घेतली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मंत्री मिसाळ यांच्यासमोर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे सादरीकरण करत संपूर्ण माहिती दिली आहे. पहिल्या टप्प्यात अंबाबाई मंदिराच्या विकासा आराखड्यामध्ये मंदिराचं आतलं काम देखील घेतलं पाहिजे. अशी सूचना मंत्री मिसाळ यांनी करत याचा तात्काळ प्रस्ताव राज्य सरकारला पाठवण्याची आदेश दिले. लवकरच सुधारित आराखडा हा शिखर समितीकडे प्राप्त होईल असेही त्यांनी यावेळी म्हटल आहे.
Message