शनिवार, दिनांक १८ ऑक्टोबर २०२५ रोजी फॅमिली फिजिशियन्स असोसिएशन, नासिक व नामको हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने श्री धन्वंतरी पूजन व श्री धन्वंतरी पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध कर्करोगतज्ञ डॉ. नागेश मदनूरकर, एफ.पी.ए. नाशिकच्या अध्यक्ष डॉ. शीतल सुरजुसे, सचिव डॉ. विजय मुंदडा, तसेच सुप्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. चंद्रतेज कदम, डॉ. अभिजित सोनावणे,डॉ. पल्लव कपुर, डॉ. निखिल कुलकर्णी, नामको हॉस्पिटलचे जनरल मॅनेजर ॲडमिनिस्ट्रेशन श्री. समीर तुळजापूरकर, मेडिकल सुप्रिटेंडंट डॉ. विशाखा जहागिरदार उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. अजय भंसाळी यांनी सादर केलेली गणेश वंदना, दीपप्रज्वलन व श्री धन्वंतरी पूजन करून करण्यात आली.
डॉक्टर तेजू सोलोमन यांनी सुमधुर आवाजात श्री धन्वंतरी स्तवन सादर केले.
प्रमुख पाहुण्यांचा व इतर मान्यवरांचा सत्कार संघटनेचे पदाधिकारी, माजी अध्यक्ष व संघटनेच्या ज्येष्ठ सदस्यांच्या हस्ते पार पडला.
सन २०२५ चा श्री धन्वंतरी पुरस्कार ज्येष्ठ चिकित्सक व संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. गुलाब घरटे व सल्लागार समिती सदस्य डॉ. सौ. स्मिता कांबळे यांना प्रदान करण्यात आला.
डॉ. रुपेश मर्दा, डॉ. ज्योती पाटील, डॉ. सुनंदा मुंदडा, डॉ. मनिषा मर्दा, डॉ. राखी मुथा यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी अत्यंत शानदार पद्धतीने पार पाडली. डॉ. मुक्तेश्वर जाधव यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नामको हॉस्पिटलचे मेडिकल सुप्रीटेंडंट डॉ. विशाखा पाटील मॅडम, तेजस सावंत व नामको हॉस्पिटल चा स्टाफ यांनी मोलाचे सहकार्य केले.
संघटनेच्या 100 हून अधिक वैद्यकीय सभासदांनी आपला सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतगायनाने करण्यात आली.
उपस्थित सर्व सभासदांना भेटवस्तू देण्यात आली.