निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीतील राकेश भिका शेवाळे रा. जैताणे यांनी दिनांक १६/०८/२०२५ रोजी जैताणे गावातील भवानी मंदीराजवळील संघशक्ती सार्वजनिक व्यायाम शाळा, जैताणे याचे बॅनर व सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड केली म्हणुन निजामपुर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.
घटनेचे गांभीर्य पाहता मा. पोलीस अधिक्षक सो. धुळे यांच्या आदेशावरून तसेच मा. न्यायालयाची परवानगी घेऊन घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता जैताणे येथील १) बापु पुंडलीक खैरनार (उर्फ बापु पैलवान) २) अनिल शांताराम जाधव दोन्ही रा. जैताणे ता. साक्री यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडुन गुन्ह्यात वापरलेली लाल रंगाची होंडा युनीकॉर्न कंपनीची एम. एच.१८ बी.वाय.८३६८ नंबर असलेली ६०,०००/-रुपये किंमतीची मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.
निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. मयुर एस. भामरे यांनी निजामपुर,जैताणे तसेच माळमाथा परीसरातील सर्व जनतेला आवाहन केले आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, व कोणीही कायदा हातात घेऊ नये, सोशल मिडीयावरील सर्व बाबींवर प्रशासन लक्ष ठेऊन आहे.
हि कारवाई मा. श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक, धुळे, मा. डॉ. अजय देवरे, अपर पोलीस अधिक्षक, धुळे, मा. एस. आर. बांबळे, उपविभागीय पोलीस अधीकारी, साक्री, पोनि. श्रीराम पवार, स्थागुशा धुळे यांचे मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधीकारी सपोनि श्री मयुर भामरे, सपोनि प्रियदर्शनी थोरात, पोउपनि यशवंत भामरे, पोउनि मधुकर सोमासे, पोउपनि चंद्रकांत गायकवाड, पोहेकों नारायण माळचे, पोहेकों रतन मोरे, पोहेकों प्रदीपकुमार आखाडे, पोहेकों प्रशांत ठाकुर, पोहेकों नागेश्वर सोनवणे, पोहेकों प्रदिप आखाडे, पोना खंडेराव पवार, पोकों दिपक महाले, पोकों राकेश महाले, पोकों गौतम अहिरे, पोकों मुकेश दुरगुडे, पोकों पृथ्वीराज शिंदे, पोकों सागर थाटसिंगारे, पोकों कृष्णा मिल, पोकों परमेश्वर चव्हाण, पोकों सुनिल अहिरे, पोकों अर्जुन पवार, पोकों सागर कांगणे, पोकों टिलु पावरा, पोकों श्रीराम पदमर, चापोकों मोहन माळी यांनी केली आहे.