धुळे : राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन

धुळे : राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन
  • MG News
  • मे 10 2025

Share on  

धुळे : राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन

        संपूर्ण महाराष्ट्रात आज राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन जिल्हा मुख्य न्यायाधीश माधुरी आनंद, सचिव संदीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून धुळे जिल्ह्यात एकूण 13 कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. यामध्ये धुळे न्यायालयात 9 कक्ष व तालुक्याला 4 कक्ष स्थापन करण्यात आले असून या लोक अदालती मध्ये कौटुंबिक वादाची प्रकरणे, अपघात ताची प्रकरणे, धनादेश अनादर, विज चोरी, दिवानी बँकेचे कर्जाची वाद अशी अनेक प्रकारची प्रकरणे या राष्ट्रीय लोक अदालतीत ठेवण्यात आले आहे. 

या लोक अदालातीचा फायदा हा पक्षकारांनी घ्यावा यामुळे आपापसातील प्रकरणे मिटली तर पक्षकारांनी न्यायालयाची भरलेली शुल्क परत मिळते आपापसातील कटूता टाकता येते वेळ वाचतो म्हणून नागरिकांनी जास्तीत जास्त न्यायालयीन प्रकरणे हे राष्ट्रीय लोक अदालती मध्ये सोडवावे असे आवाहन यावेळी विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संदीप स्वामी यांनी केले आहे.
 

संबंधित बातम्या