उद्योग संचालनालय आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय औद्योगिक गुंतवणूक परिषदेचे आयोजन आज धुळ्यात करण्यात आले होते. शहरातील हॉटेल टॉपलाईन या ठिकाणी या गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत या गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. या गुंतवणूक परिषदेत हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यातील आणि राज्य बाहेरील विविध व्यवसायांनी यावेळी केली असून, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत या उद्योगांच्या करारावर सह्या करण्यात आल्या.
यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलताना सांगितले की, धुळे जिल्ह्या हा गुंतवणुकीसाठी चांगला जिल्हा आहे त्यामध्ये रस्ते आहे, वीज, पाणी आहे आणि महाराष्ट्र सरकारचा मोठा सपोर्ट आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील सर्वच लोक प्रतिनिधी उद्योग जगाला पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहे. आमदार अनुप अग्रवाल यांना मी अडीच वर्षाच्या पहिले सांगितले होते की तू आमदार होशील आणि आपल्याला एम.आय.डी.सी ला आणि उद्योजकाला पुढे नेत धुळे जिल्ह्याला प्रचंड ताकतीने पुढे न्यायचं आहे असं आश्वासन दिल होत. आणि ते आता सत्यात उतरत आहे याचा मला अभिमान आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
तसेच त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, धुळ्यातील जनतेने योग्य कार्यकर्त्याला न्याय दिला आहे, विधिमंडळात डाका टाकण्याची संधी आमदार अनुप अग्रवाल यांना मिळाली आहे. मी जे बोललो ते अलीबाबा चालीस चोर नाही माझा म्हणून असं मंत्रालयातील प्रत्येक मंत्र्याच्या टेबलवर फिरून आपल्या भागातील विकास झाला पाहिजे याकरिता मंत्रालयाला आपल्या गावात आणणे याला काम करणारा असा आमदार अनुप अग्रवाल चांगल्या अर्थाने डाकू आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. यावेळी हॉलमध्ये उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
Message