डोंबिवली: कारचालकाच्या मारहाणीनंतर ६८ वर्षीय रिक्षाचालकाची आत्महत्या

डोंबिवली: कारचालकाच्या मारहाणीनंतर ६८ वर्षीय रिक्षाचालकाची आत्महत्या
  • MG News
  • जून 25 2025

Share on  

डोंबिवली पश्चिम येथे मोठागाव रोडने जात असताना मुंजाजी शेळके (वय ६८) या वृद्ध रिक्षा चालकाकडून चारचाकीला ठोकर लागून गाडीचे नुकसान झाले. यामध्ये रिक्षा चालक आणि गाडी मालक यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर कारचालकाने रिक्षा चालकाला मारहाण केली आणि त्याला रिक्षासह आपल्या घरी नेऊन डांबून ठेवले होते. त्यानंतर कार चालकाने गाडीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून पैसे आण आणि सकाळी रिक्षा घेऊन जा, असे बोलून त्यांना मध्यरात्री तीनच्या सुमारास सोडून दिले.

आपली हक्काची गाडी आणि चार चाकी गाडीचे नुकसानीसाठी लागणारे लाखो रुपये आणायचे कुठून या विवंचनेत रिक्षाचालक मुंजाजी शेळके हे मध्यरात्री तीन-साडे तीनच्या सुमारास आपल्या राहत्या घरी पश्चिमेतील फुलेनगर येथे पोहोचले.वडील शेळके यांनी घडलेला सर्व प्रकार मुलाला आणि सुनेला सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना आराम करण्यास सांगितले आणि सर्वजण झोपी गेले.

शेळके यांना आपली रिक्षा आणि गाडीचा खर्च कसा भरावा हा विचार सतवत होता. अखेर सकाळी घरातील मंडळी बाहेर गेले असताना शेळके यांनी राहत्या घरातील किचनमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी चारचाकी गाडी मालक आकाश याला पुढील चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 

संबंधित बातम्या