डोंबिवली : शूटिंग पाहण्यासाठी गेलेल्या मुलीला रात्रभर दुकानात डांबून लैंगिक अत्याचार

डोंबिवली : शूटिंग पाहण्यासाठी गेलेल्या मुलीला रात्रभर दुकानात डांबून लैंगिक अत्याचार
  • MG News
  • मे 10 2025

Share on  

डोंबिवली : शूटिंग पाहण्यासाठी गेलेल्या मुलीला रात्रभर दुकानात डांबून लैंगिक अत्याचार
  बिवली - नदीच्या किनारी सुरू असलेले शूटिंग बघण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला रात्रभर दुकानात डांबून तिच्यावर दुकानदाराने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. कल्याण जवळील आंबिवली परिसरात ही घटना घडली असून, याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलीस ठाण्यात दुकानदार गणेश म्हात्रे (वय 21) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, आंबिवली स्टेशन परिसरात पीडित मुलीचे कुटुंब रहाते. तिचे आई वडील भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. सोमवारी रात्री 8 च्या सुमारास पीडित मुलगी मैत्रिणीकडे जाऊन येते सांगून घरातून निघाली. परंतु खूप वेळ झाला तरी ती परत न आल्याने आई वडिलांनी तिचा शोध घेतला मात्र ती दिसून आली नाही.

दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी ही मुलगी त्याच परिसरात आढळून आली. विश्वासात घेऊन तिच्या कुटुंबीयांनी तिची विचारपूस केली असता तिने तिच्यासोबत रात्रभर घडलेला प्रसंग सांगितला.

आंबिवली येथील काळू नदी किनारी शूटिंग सुरू होती. ही शूटिंग पाहण्यासाठी ही अल्पवयीन मुलगी त्या ठिकाणी गेली होती. याच परिसरातच गणेश म्हात्रे याचे किराणा मालाचे दुकान आहे. गणेशने मुलीला दुकानात बोलावत तेथे थांबायला सांगितले.

मुलीने त्याला नकार दिला असता त्याने जबरदस्ती तिला दुकानात खेचून दुकानाचे शटर बंद करून घेतले. आरडाओरडा केला तर तुला मारेल व तूझी बदनामी होईल अशी धमकी त्याने मुलीला दिली. त्यानंतर त्याने तिच्यावर दोनदा लैंगिक अत्याचार केला.

संबंधित बातम्या