डोंबिवली : एमआयडीसी परिसरात सर्व्हिस रोडला लागून असलेल्या मोठ्या नाल्याला दुर्गंधीयुक्त काळसर पाणी डोंबिवली एमआयडीसी सर्व्हिस रस्ता लागून असलेल्या मोठ्या नाल्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून दुर्गंधीयुक्त फेसाळ आणि काळसर पाणी जमा झाल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे हे पाणी वाहून जात नसल्याने त्यात डासांची उत्पत्ती पण मोठ्या प्रमाणात होत आहे. यातून एमआयडीसी पाण्याच्या मोठ्या पाईपलाईन आणि त्यावरील व्हॉल्व असल्याने त्यावर जर गळती झाली तर हेच घाण पाणी पाईपलाईन मध्ये मिक्स होण्याची शक्यता आहे. एकंदरीत हा नाला येथील नागरिकांच्या आरोग्यासाठी चिंताजनक असून, याकडे येथील नागरिकांनी एमआयडीसी आणि केडीएमसी यांचे लक्ष वेधले आहे. या नाल्याच्या संरक्षक भिंतीला एमआयडीसीकडून भोक पाडले गेले असून, त्यातून नाल्याचे पाणी बाहेर येवून कल्याण शीळ रस्त्याच्या कडेला आणि वंदेमातरम उद्यान जवळ असलेल्या नाल्यात जात असते. त्यामुळे याचा त्रास वंदेमातरम उद्यानात येणार्या लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना होत असतो.
अरुण जोशी, स्थानिक नागरिक