अंबाजोगाई-अहमदपूर एसटी बसमध्ये छत्रीने पावसापासून चालकाचे संरक्षण; एसटीची दयनीय अवस्था उघड

अंबाजोगाई-अहमदपूर एसटी बसमध्ये छत्रीने पावसापासून चालकाचे संरक्षण; एसटीची दयनीय अवस्था उघड
  • MG News
  • जुलै 26 2025

Share on  

 बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई आगाराच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसमधील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अंबाजोगाई-अहमदपूर मार्गावर धावणाऱ्या एका बसमध्ये एक प्रवासी चक्क चालकाला पावसापासून वाचवण्यासाठी छत्री पकडून उभा असल्याचे दिसत आहे. यामुळे अंबाजोगाई आगाराच्या एसटी बसेसची दयनीय अवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
    व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, बसच्या छतातून पाणी गळत आहे आणि त्यामुळे चालकाला गाडी चालवताना अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत एका सहृदय प्रवाशाने पुढाकार घेऊन चालकाला छत्री धरून मदत केली. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेवर आणि एसटी महामंडळाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी लवकरात लवकर या बसेसची दुरुस्ती करण्याची आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवास सेवा पुरवण्याची मागणी केली आहे.

संबंधित बातम्या