चाळीसगावात कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज महामार्ग पोलिसांकडून जप्त

 चाळीसगावात कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज  महामार्ग पोलिसांकडून जप्त
  • MG News
  • जुलै 25 2025

Share on  

पोलिसांनी आज मोठी कारवाई कर कोट्यवधी रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ,अँफेटामाईन किव्हा केटामाईन सारखा उच्चप्रभावी अमली पदार्थ असल्याचे उघड झाले आहे या प्रकरणी चालकाला अटक करण्यात आली असून या पूर्वी देखील. तो ८ वर्ष अंमली पदार्थ तस्करी च्या गुन्ह्यात तुरुंगात मुक्काम करुन आला आहे.

घटनास्थळी पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी  तात्काळ पोहचले असून, संपूर्ण परिसर बंदोबस्तात होता, पोलिसांकडून पंचनामा करुन पंचाच्या समक्ष् मोजमाप करुन ड्रग्स ताब्यात घेण्यात आले हे ड्रग  कुठून आले, कुणासाठी होते, आणि कोठे नेले जात होते याची चौकशी पोलिसांनी केली. 

असता मारोती कंपनीची ब्रेझा क्र. डीएल ९ सीसी ७७७१ या क्रमांकाच्या गाडीतुन हे ड्रग्स औरंगाबाद मार्गे बँगलोरकडे नेले जाणार होते. कन्नड घाटाखाली वाहतूक शाखेच्या पोलिसांनी  नाकाबंदी केली असता ब्रेझा आली चालकाला गाडीत काय आहे विचारलं असता 'कुछ मत पूछो साब आपको क्या चाहिये बोलो' असं ड्रॉयव्हर बोलला संशय आल्याने पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पाटील आणि वाहतूक पोलिसांनी गाडी अडवून तपासून पाहिलं असता त्यात हा ड्रग्स साठा  आढळून आला.
कारवाई करणाऱ्या पोलिसांचं आमदार मंगेश चव्हाण  यांनी कौतुक केलं.

संबंधित बातम्या