मुसळधार पावसामुळे लिंबे वडगाव दलित वस्तीचा तालुक्याशी संपर्क तुटला

 मुसळधार पावसामुळे लिंबे वडगाव दलित वस्तीचा तालुक्याशी संपर्क तुटला
  • MG News
  • जुलै 22 2025

Share on  

जालना जिल्ह्यातील लिंबेवडगाव दलित वस्ती येथील साठवण तलावाचं पाणी रस्त्यावर आल्याने तालुक्याचा संपर्क तुटला आहे. लिंबे वडगाव पाटोदा शिवारात मुसळधार पाऊस झाल्यानं येथील साठवण तलावाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून तलावाचं पाणी थेट रस्त्यावरती आलं आहे. त्यामुळं लिंबेवडगाव दलित वस्ती वरून तालुक्याला जाण्यासाठीचा नागरिकांचा संपर्क तुटला आहे.

येथील नागरिक, विद्यार्थ्यांना जीवघेणाप्रवास करावा लागत आहे. त्यामुळे यात स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून नागरिकांचा रस्ता सुकर करून द्यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

संबंधित बातम्या