सुकळी जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा येथे शिक्षण समिती स्थापन

सुकळी जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा येथे शिक्षण समिती स्थापन
  • MG News
  • सप्टेंबर 27 2025

Share on  

आज दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा सुकळी येथे नव्याने शिक्षण समिती स्थापन करण्यात आली. शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी प्रदीप विश्वनाथ सोनवणे तर उपाध्यक्षपदी महेंद्र दादाराव कोळी यांची निवड करण्यात आली. तसेच समिती मधील सदस्य व त्यांची पण बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच समितीमध्ये निवड करत असताना जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अडकमोल सर खैरनार सर संजय पाटील सर यांच्यातर्फे तसेच समस्त गावकरी ग्रामपंचायत सदस्य, नितीन नाना पाटील, प्रमोद गायकवाड, सुनील कोळी  तसेच माजी अध्यक्ष पुंडलिक कोळी यांच्यातर्फे निवड प्रक्रिया पार पडली. 


एमजी न्यूज ज्ञानेश्वर सावळे मुक्ताईनगर

संबंधित बातम्या