ठाणे  ऐतिहासिक गडकिल्ल्यांच्या देखाव्याचे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

ठाणे  ऐतिहासिक गडकिल्ल्यांच्या देखाव्याचे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
  • MG News
  • मे 2 2025

Share on  

ठाणे  ऐतिहासिक गडकिल्ल्यांच्या देखाव्याचे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

ठाणे जय महाराष्ट्र नगर येथे साकारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांच्या देखाव्याचे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

 तरुण पिढीला इतिहास माहिती व्हावा यासाठी ठाण्यातील जय महाराष्ट्र नगर मध्ये रवींद्र फाटक यांच्या माध्यमातून भिंतीशिल्प साकारण्यात आले असून, या मध्ये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या गड किल्ल्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे एक क्यूआर कोड प्रत्येक किल्ल्याच्या बाजूला लावण्यात आला असून, या क्यूआर कोडच्या माध्यमातून संबंधित किल्ल्याची संपूर्ण माहिती मिळणार आहे. आजूबाजूला शाळा असल्याने शाळेतील विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिकांना किल्ल्यांबद्दल माहिती व्हावी यासाठी हा उपक्रम साकारण्यात आला असल्याचं रविंद्र फाटक यांनी सांगितले. अजून 1 मे निमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याचा लोकार्पण सोहळा पार पडला.

 रविंद्र फाटक, माजी आमदार विधानपरिषद

संबंधित बातम्या