डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राद्वारे अनुसूचित जातीच्या प्रवर्गातीला युवक व युवतींना एक महिना कालवधीचे विनामुल्य "उद्योजकता विकास प्रशिक्षण" आयोजित करण्यात आलेले आहे.
एक महिना कालावधीचे प्रशिक्षण कार्यक्रमाचा कालावधी दि. ०७ नोव्हेंबर पासून ०६ डिसेंबर २०२५ रोजी असा आहे. अनुसूचित जातीतील युवक-युवती, नवउद्योजकना उद्योजकता विकास संबंधी प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःचा उद्योग व्यवसाय स्वयंरोजगार निर्माण करण्यास प्रवूर्त करणे हा कार्यक्रमाचा उद्देश आहे.
अनिवासी स्वरूपाचा या प्रशिक्षण कार्यक्रमातून सहभागी प्रशिक्षणार्थीना शासकीय कर्ज योजनांची माहिती, सिद्धी प्रेरणा प्रशिक्षण, उत्पादनाच्या किंमती, हिशोब पध्दती, उद्योग नोंदणी प्रमाणपत्र, उद्द्योजकिय व्यक्तिमत्व विकास, विविध क्षेत्रातील उद्योगसंधी, उद्योगाची निवड, प्रकल्प अहवाल, मार्केटिंग, ई टेंडर, उद्योगांना प्रत्यक्ष भेटी, उद्योगाचे वित्तीय व्यवस्थापन याविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.
किमान इयत्ता आठवी उत्तीर्णाना प्रवेश मिळू शकेल. वयोमर्यादा १८ ते ४५ आहे. अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील जातीचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळा सोडण्याचा दाखला, गुणपत्रिका, छायाचित्र आदी कागदपत्रे घेऊन दि. ०४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० ते दु. २.०० वाजेपर्यंत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, उद्योग भवन, सातपूर आयटीआय जवळ, त्रंबकरोड, सातपूर, नाशिक येथे हजर राहावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, बार्टी, नाशिक यांनी पत्रकाव्दारे केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क प्रकल्प अधिकारी, बार्टी, नाशिक मो. ९५७९६१५७८० वर साधावा.