बीडमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा उत्साह

बीडमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा उत्साह
  • MG News
  • ऑगस्ट 1 2025

Share on  

आज राज्यात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती उत्साहात साजरी होत आहे. या पार्श्वभूमीवर बीड शहरात देखील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात पार पडत आहे. या जयंतीच्या पार्श्वभूमीवर बीड शहरातील चांदणे वाडा ते अण्णाभाऊ साठे पुतळ्यापर्यंत भव्य दिव्य साहित्य दिंडी काढण्यात आली. यावेळी साहित्य रथ देखील बनवण्यात आला होता. तर या साहित्य दिंडीत कर्नाटक येथील वाजंत्री पथक देखील आपली कला दाखवण्यासाठी आणले होते.

दरम्यान साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न जाहीर करावा, राज्य सरकारने केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावा. अशी मागणी  डीपीआयचे नेते अजिंक्य चांदणे यांनी केली आहे.

संबंधित बातम्या