लक्ष्मण हाकेंना महागडी फॉर्च्यूनर लेजेंडर गिफ्ट; भंडारा उधळत मनोज जरांगेंना दिला इशारा
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना परभणीच्या राणीसावरगाव येथील ओबीसी बांधवांनी महागडी अशी फॉर्च्यूनर लेजेंडर कार गिफ्ट केली आहे
जालना : राज्यात मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मोठं आंदोलन उभारण्यात आलं होतं. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात आली. त्यामुळे, ओबीसी नेत्यांनी एकत्र येत जरांगेच्या आंदोलनाविरुद्ध प्रतिआंदोलन केलं. ओसीबी नेते लक्ष्मण हाके यांनी जालन्यातील वडगोद्री येथे आंदोलनासाठी मंडप उभारत उपोषण केले होते. त्यातून, लक्ष्मण हाकेंचं नेतृत्व उदयास आल. त्यानंतर, सातत्याने त्यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका करत आपल्या ओबीसीचा लढा पुढे नेण्याचं काम केलं आहे. त्यामुळे, परभणीत ओसीबी समाज बांधवांनी आज लक्ष्मण हाकेयांना चक्क फॉर्च्युनर कार गिफ्ट केली आहे.
यावेळी बोलताना हाकेंनी समाजाचं ऋण व्यक्त केलं. मला ही गाडी देण्यात आलीय, त्याचा वापर मी करणार असल्याचे त्यांनी म्हटले.