बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरण: किरीट सोमय्या यांनी दिली पोलीस ठाण्याला भेट
बनावट जन्म दाखला काढल्याप्रकरणात स्थानिक नेत्यांसह अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा संशय भाजप नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला आहे. बनावट जन्म दाखला हा मोठा घोटाळा असून, येत्या दहा दिवसात या प्रकरणात मोठी उलघड होणार असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले. अर्धापूर ग्रामीण रुग्णालयातून तब्बल ८२ बनावट जन्म दाखला देण्यात आल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. पुणे पासपोर्ट कार्यालयाच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस आला. रुग्णालयातील एका कंत्राटी कर्मचाऱ्याने नगर पंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांची बनावट सही मारून शिक्का वापरून 82 जणांना बनावट जन्मदाखला वाटप केले. या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. बांगलादेशी कनेक्शन आहे का नाही लवकरच उघडकीस येणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.