जालना ते देऊळगाव राजा रोडवरील जामवाडी येथे प्रहार संघटनेसह शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय. महायुती सरकार सत्तेत येण्याआधी निवडणुकीत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. मात्र महायुती सरकार सत्तेत येऊन सहा महिने लोटले. पावसाळी अधिवेशनही पार पडलं. मात्र सरकारने दिलेलेलं आश्वासन पाळलं नाही. त्यामुळं प्रहार संघटनेसह शेतकऱ्यांनी जामवाडी येथे रास्ता रोको आंदोलन केलंय. दरम्यान या आंदोलनामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.