अमरावती जिल्ह्यात हुमनी अळीच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रादुर्भावामुळे बहुतांश शेतीपिके जळाली असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान भातकुली तालुक्यातील उमेश महिंगे यांच्या चार एकर मध्ये सोयाबीनवर हुमणी अडीने त्यांच पीक पूर्णपणे जळाल आहे.
कृषी विभागाने याची पाहणी करत, शेतकऱ्यांना उपाय योजना सुचवल्या आहेत. शासनाने पुरवलेली बियाणे आणि सेंद्रिय खतांचा वापर केल्यानंतरही हा प्रादुर्भाव वाढत असल्याने, शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. हुमनी अळीच्या प्रादुर्भावाने अमरावतीच्या भातकुली तालुक्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे.
शेतीपिकांचे नुकसान, दुबार पेरणीचा खर्च आणि प्रशासनाचा निष्क्रिय दृष्टिकोन यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. तातडीने उपाय योजना आणि नुकसान भरपाई न मिळाल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान आणखी वाढण्याची भीती आहे. यासाठी शासनाने त्वरित लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे.