पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांवर कपाशीचे पीक काढण्याची नामुष्की

पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांवर कपाशीचे पीक काढण्याची नामुष्की
  • MG News
  • जुलै 22 2025

Share on  


 एकीकडे संपूर्ण राज्यभरामध्ये पावसाची जोरदार हजेरी लागत असताना धुळे जिल्ह्यातील धुळे तालुका तसेच शिंदखेडा तालुका अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. तसेच शिरपूर आणि साक्री तालुक्यातील काही भागात देखील अद्यापही पावसाची हजेरी लागलेली नाही जुलै महिन्याची २२ तारीख उलटून देखील पावसाची दमदार हजेरी न लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. एकीकडे राज्याचे कृषिमंत्री रमी खेळण्यात व्यस्त असताना दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा कायम लागली आहे.

यामुळे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी लागवड केलेली पिके करपण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होऊ लागली आहे. तसेच दुसरीकडे धुळे तालुक्यातील शेतकऱ्याने लावलेले कपाशीचे पीक पावसाअभावी काढून टाकण्याची वेळ आली असून राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या