राज्यात दिवसाला तेरा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याची आकडेवारी समोर आली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सरकारने धोरण आखून जास्तीत जास्त पर्यायी बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, त्याचबरोबर इतर देशाप्रमाणे अद्यावत आणि आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यावे, जेनेटिक इंजीनियरिंग चे प्रयोग राबवले जावेत. अशी मागणी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ललित बहाळे यांनी केली आहे, त्याचबरोबर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींना आमचा विरोध आहे, आणि इतर शेतकरी संघटनेच्या नेत्यांची भूमिका भरकटलेली असून ते शाळा सोडून गेलेले विद्यार्थी आहेत, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे, ते बुलढाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.