शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

 शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
  • MG News
  • मे 27 2025

Share on  

 शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

 जालना-नांदेड समृद्धी महामार्गासाठी जमिनीचे फेरमूल्यांकन करून बाजारभावाच्या पाचपट मावेजा द्या, या मागणीसाठी आज जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. जालना तालुक्यातील देवमूर्ती गावच्या शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले. आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. सरकार आणि प्रशासनाकडून मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन गनिमी कावा पद्धतीने आत्मदहन आंदोलन करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या