शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये : हवामान खात्याच्या शेतकऱ्यांना सल्ला 

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये : हवामान खात्याच्या शेतकऱ्यांना सल्ला 
  • MG News
  • मे 28 2025

Share on  

पश्चिम रशियात तयार झालेल्या, जास्त दाबाच्या पट्ट्याच्या परिणाम राज्यातील आणि देशातील मान्सुमच्या  प्रवासावर होणार आहे. या जास्त दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सुमची गती मंदावणार आहे. बुधवार २८ मे पासून तापमान देखील वाढण्याची शक्यता आहे. ही स्थिती ५ जुनपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये.सध्या मान्सुम लवकर आला आहे, असे समजून शेतकऱ्यांनी पेरणी केल्यास त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ येऊ शकते, असे हवामान खात्यातर्फे शेतकऱ्यांना कळवण्यात आले आहे. लंडनस्थित,'नॅशनल सेंटर फॉर ऍटमॉस्फरिक सायन्स ऑफ मेट्रोलॉजी डिपार्टमेंट' च्या मदतीने भारतीय हवामान खात्याने हे संशोधन केले आहे .

संबंधित बातम्या