काल पहाटेच्या सुमारास साकोलीच्या जुना शहरातील ९० एकर परिसरात असलेला मालगुजारी तलाव फुटला. यामुळं ४०० हेक्टर परिसरातील शेती जलमय झाली. तर, अनेक एकरातील शेती अक्षरश: खरडून निघाली. ज्यांनी १५ दिवसांपूर्वी भात पिकाची लागवड केली होती, अशाही शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला असून भात पीक अक्षरश: वाहून गेलंय. ज्या शेतकऱ्यांची शेती खरडून निघाली अशांना खरीप हंगामाच्या पिकाला मुकावं लागणार आहे.