अन्यायग्रस्त आदिवासी जमातीच्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषण

अन्यायग्रस्त आदिवासी जमातीच्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषण
  • MG News
  • ऑक्टोबर 4 2025

Share on  

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सर्वजण आपण आपापल्या घरात दसरा सण साजरा करण्यासाठी मग्न होतो; परंतु जळगाव जिल्ह्यातील आपले संजय प्रल्हाद कांडेलकर हे आपल्या जमातीला न्याय मिळवून देण्याकरता दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर जमातीच्या रक्षणासाठी मुक्ताईनगर  येथे बेमुदत आमरण उपोषणाला बसलेले आहेत.  दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आमरण उपोषणाची सुरुवात झालेली आहे. 
आपल्या जमातीचा प्रश्न शासन दरबारी पोहोचवण्याकरता हे त्यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे.  तरी समाज बांधवांना व महाराष्ट्रातील तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्व लहान-मोठ्या सर्व समाज बांधवांना, महिला, भगिनींना एक कळकळीची विनंती करण्यात येते की, संजय भाऊ कांडेलकर यांच्या  उपोषणाला जास्तीत जास्त संख्येने पाठिंबा देऊन जास्तीत जास्त संख्येने तिथे उपस्थित राहून शासनावर प्रशासनावर दबाव निर्माण करावा व आपला न्याय हक्क आपल्या पदरात पाडून घ्यावा.  मागिल वर्षी सुद्धा २६ दिवस उपोषण  करणारे संजय भाऊ कांडेलकर यांच्या सारखे लढाऊ आणि जिद्दी कार्यकर्ता आपल्याकडे आहे याचा सर्व समाजाला गर्व आहे. 

संबंधित बातम्या