कोल्हापूर राधानगरी मार्गावर अल्पवयीन मुलांकडून चारचाकी कार चालवताना नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात घडला आहे. कॉलेज सुटल्यानंतर बसची वाट पाहत उभ्या असलेल्या भोगावती महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या घोळक्यात भरधाव चारचाकी घुसली. या भीषण अपघातात प्रज्ञा कांबळे या 18 वर्षीय विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला असून, तीन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत.
अपघातानंतर वाहनातील अल्पवयीन चालक आणि त्याचा साथीदार पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, मात्र शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी पाठलाग करत त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास कुरुकली येथील बस स्टॉपवर ही घटना घडली.