यवतमाळ  पुसद येथे मुलगी युपीएससी उत्तीर्ण झाल्याच्या आनंदात वडिलांचा हृदयविकाराने मृत्यू

यवतमाळ  पुसद येथे मुलगी युपीएससी उत्तीर्ण झाल्याच्या आनंदात वडिलांचा हृदयविकाराने मृत्यू
  • MG News
  • एप्रिल 29 2025

Share on  

यवतमाळ  पुसद येथे मुलगी युपीएससी उत्तीर्ण झाल्याच्या आनंदात वडिलांचा हृदयविकाराने मृत्यू.

यवतमाळ - जिद्द व चिकाटीने  युपीएससी परीक्षा मुलगी उत्तीर्ण झाली. सर्वत्र आनंदाचे वातावरण असतानाच  वडिलांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना पुसद येथे घडली. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.सेवानिवृत्त विस्तार अधिकारी प्रल्हाद दत्ता खंदारे, असे निधन झालेल्या अभागी वडिलांचे नाव आहे.  मोहिनी  खंदारे ही नुकतीच कठीण समजली जाणारी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाली. यात ८४४ वी रँक मिळाली. खंदारे परिवारात आनंदाचे वातावरण पसरले. त्यांनी आपले मुळगाव महागाव तालुक्यातील माळवागद येथे पेढे वाटून आनंद साजरा केला. हर्षोल्हसात असतानाच अचानक प्रल्हाद खंदारे यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना  खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी प्रमिलाबाई, युपीएससी परीक्षा उत्तीर्ण मुलगी मोहिनी खंदारे, न्यायाधीश मुलगा विक्रांत व न्यायाधीश सून स्वाती, असा बराच मोठा आप्त परिवार आहे. पुसदच्या मोक्षधामात त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

 मनीष जाधव (ग्रामस्थ)

संबंधित बातम्या