अखेर कोकाटे यांना कृषीमंत्री पदावरून व्हावे लागले पायउतार

अखेर कोकाटे यांना कृषीमंत्री पदावरून व्हावे लागले पायउतार
  • MG News
  • ऑगस्ट 1 2025

Share on  

विधानभवनात ऑनलाईन रमी खेळणे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना चांगलेच भोवले आहे.

आज त्यांच्याकडून कृषी विभागाचा कारभार काढून घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे. माणिकराव कोकाटे यांना क्रीडा विभागाचा कारभार सोपवण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी विभागाचा पदभार काढून घेतला आहे. आता माणिकराव कोकाटे यांच्याकडे क्रीडा मंत्रिपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर कृषी विभागाचा कार्यभार दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
विधान भवनात माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा ऑनलाईन रमी खेळताना एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर माणिकराव कोकाटे चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. ऑनलाइन रमीच्या व्हिडिओवर स्पष्टीकरण देताना त्यांनी शेतकरी नव्हे तर सरकार भिकारी आहे असे वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांच्या या विधानावर नाराजी व्यक्त केली होती.

ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हिडिओ आणि वादग्रस्त विधान यामुळे विरोधकांनी देखील माणिकराव कोकाटेंवर टीका सुरूच ठेवली होती. विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. मात्र आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यात एक महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीला गेल्याचे समोर आले होते. अखेर माणिकराव कोकाटे यांचे कृषिमंत्री पद काढून घेऊन त्यांना क्रीडा विभागाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.

संबंधित बातम्या