मुंबईतील घाटकोपर येथील एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. घाटकोपर येथील ऑर्किड टॉवर येथे ही भीषण आग लागल्याची माहिती आहे. ऑर्किड टॉवरच्या बिल्डिंग नंबर सहाच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये ही आग लागली आहे. या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी सध्या अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस प्रयत्न करत आहेत. या फ्लॅटमध्ये कोण राहते, सध्या घरात किती लोक आहेत आणि ही आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत सध्या काहीही माहिती मिळू शकलेली नाही. सध्या पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान या आगीवर नियंत्रण मिळवून घरातील लोकांना सुखरुप बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत. तसेच, ही आग अजून पसरु नये, याचीही काळजी घेतली जात आहे. तरी या घटनेने ऑर्किड टॉवर परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. आगीचा भडका मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.