पर्यावरण समतोलासाठी नाशिकमध्ये शनिवारी प्रथमच राष्ट्रीय परिषद

पर्यावरण समतोलासाठी नाशिकमध्ये शनिवारी  प्रथमच राष्ट्रीय परिषद
  • MG News
  • सप्टेंबर 25 2025

Share on  

पर्यावरण समतोल सह नद्यांतील प्रदूषण रोखण्यासाठी भारतातील प्रथमच एक दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन नाशिकमध्ये शनिवार २७ सप्टेंबर  रोजी सकाळी ८:३० ते सायंकाळी ६:३० या वेळेत , नाशिक पुणे महामार्गावरील 
नासिक क्लब हॉटेल येथे होणार आहे. अधिवेशनाचे उद्घाटन केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयाच्या संचालिका डॉक्टर सविता माधवी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मेंटल हेल्थ संस्थेच्या संचालिका मंगल कर्डिले यांनी पत्रकार परिषदेत दिली.


दि आर एम के मेमरी फाऊदेश, के कॅन्सल्टेशन, मेंटल हेल्थ एम्स, व ए आर दि एस आय नाशिक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि दिल्लीच्या क्लायमेट चेंज संस्थेबरोबर - आय आय एस दि व सी एम आय - इन्स्टिट्यूट फॉर सस्टनेबल डेव्हलोपमेंट व कार्बन मायनस इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अधिवेशनात  नद्यांतील प्रदूषण, शहरातील किंवा छोट्या गावातील कचरा निवारण व्यवस्था, विविध व्यवसायाचे कारखाने,  पाण्याचे प्रदूषण ह्या विषयाची चर्चा होणार आहे.  
प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण आणि पाणी क्षेत्रातील  मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे . नाशिकमधील व महाराष्ट्रातील महत्वाच्या सरकारी यंत्रणा, तसेच दिल्लीतील व देशाच्या सर्व कोपऱ्यातून (तामिळनाडू, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, ओरीसा, गोवा, गुजरात, उत्तर प्रदेश अशा राज्यातून सर्व तज्ज्ञ मंडळी एकत्रित येणार आहेत.  इच्छुकांनी 
https://kconsultation.com/agenda.php या लिंक वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी विक्रम अहिरे, पुनम पाठक, प्रणिता होनराव आदी उपस्थित होते. 

संबंधित बातम्या