रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टला नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी चा परवाना दिला आहे. यामुळे आता फ्लिपकार्ट त्याच्या प्लॅटफॉर्मवर कर्ज देणार आहे.
फ्लिपकार्ट आधीच तिच्या प्लॅटफॉर्मवर "बाय नाऊ पे लेटर" आणि थर्ड पार्टी वित्तीय संस्थेद्वारे EMI सारख्या सुविधा देते.
आता NBFC परवान्यासह कंपनी कोणत्याही थर्ड पार्टीवर अवलंबून न राहता स्वतंत्रपणे कर्ज देण्याची सुविधा करू शकते. यामुळे फ्लिपकार्टला ऍमेझॉन सारख्या स्पर्धकांच्या विरोधात आणखी बळकटी मिळेल.
या परवान्याद्वारे फ्लिपकार्ट आपल्या ग्राहकांना स्वस्त आणि सोपे कर्ज प्रदान करेल. ज्यामुळे खरेदीचा अनुभव आणखी सुधारेल.