गोंदिया जिल्ह्यात जुलै महिन्यात दोन वेळा पूर परिस्थिती निर्माण झाली. या पूर परिस्थितीच्या नुकसानीची प्राथमिक आकडेवारी गोंदिया जिल्हा प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली असून या एका महिन्यात ५ जणांचा मृत्यू झाला असून १५ जनावरे दगावली आहेत. तर ७२० घरांचे देखील नुकसान झाले असून २५० जनावरांचे गोठे देखील पडले आहेत. या पूर परिस्थितीत नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील महत्त्वाचे चार धरण मध्ये पाणी साठा मध्ये वाढ झाली आहे. इटियाडो धरण मध्ये ९८% पाणीसाठा, शिरपूर धरण मध्ये ७०% पाणीसाठा, कालीसराळ मध्ये ६८% पाणीसाठा आणि पुजारी टोला धरणात ६७% पाणीसाठा आजच्या घडीला उपलब्ध आहेत.