माजी खासदार समीर भुजबळ २८ व २९ जुलै रोजी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर

माजी खासदार समीर भुजबळ २८ व २९ जुलै रोजी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर
  • MG News
  • जुलै 25 2025

Share on  

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार समता परिषदेचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी कार्याध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ हे राज्यभर दौरा करत पदाधिकाऱ्यांच्या जिल्हानिहाय आढावा बैठक घेत आहे. त्यानिमित्ताने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ हे दि.२८ व २९ जुलै २०२५ रोजी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत चाकण, पिंपरी चिंचवड, पुणे शहर, सासवड येथे समता परिषदेच्या आढावा बैठका होणार आहे. या बैठकांना समता सैनिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्याध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर संघटन अधिक मजबूत करण्यासाठी माजी खासदार समीर भुजबळ हे महाराष्ट्रभर दौरा करत असून जिल्हानिहाय आढावा बैठका घेत आहे. नुकताच त्यांनी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात जिल्हा निहाय आढावा बैठका घेऊन नवीन नियुक्त्या तसेच संघटनेच्या पुढील वाटचालीबाबत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांना संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सूचना केल्या आहे. त्यांच्या या बैठकांना अतिशय चांगला प्रतिसाद देखील लाभत आहे. 

कार्याध्यक्ष समीर भुजबळ हे आता दि.२८ व २९ जुलै २०२५ रोजी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. सोमवार दि.२८ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता गुडलक हॉटेल चाकण येथे पुणे ग्रामीण पश्चिम विभागाची बैठक घेणार आहे. दुपारी २.३० वाजता हॉटेल घरोंदा मोरवाडी पिंपरी येथे पिंपरी चिंचवड शहराची बैठक घेणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४.३० वाजता शासकीय विश्रामगृह, पुणे येथे पुणे शहराची आढावा बैठक घेणार आहे. मंगळवार,दि.२९ जुलै २०२५ रोजी सकाळी ९.१५ वाजता शासकीय विश्राम गृह, सासवड येथे पुणे ग्रामीण पूर्व विभागाची आढावा बैठक घेणार आहे.

संबंधित बातम्या