गडचिरोली : आमदार विजय वडेट्टीवार यांची पत्रकार परिषद
आज गडचिरोली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते व आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
वडेट्टीवार यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला किमान एक कोटी रुपये मिळालाच पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे ही माझी भूमिका असून, मी सदैव शेतकऱ्यांच्या बाजूने उभा आहे.
ते पुढे म्हणाले की, जिल्ह्याच्या विकासासाठी काँग्रेस पक्ष कधीच विरोध करत नाही, परंतु सध्याच्या त्रिमूर्ती सरकारकडून केवळ कमिशन खाण्याचे राजकारण सुरू आहे. विकासाच्या नावाखाली सामान्य जनतेची फसवणूक केली जात आहे.
वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, जिल्ह्याच्या विकासाच्या संधी, तसेच शासनाच्या हलगर्जी कारभारावर तीव्र शब्दात भाष्य केलं.