शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमजूर, दिव्यांग आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासाठी बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. त्यांच्या प्रहार संघटनेने आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. "शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा" या मुख्य मागणीसाठी बच्चू कडूंनी विदर्भात पदयात्रा काढली होती. या यात्रेदरम्यानच आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. आता सरकारला दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी रस्त्यावरची लढाई सुरू केली आहे. यामध्ये आज बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव ते खामगाव राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
बुलढाणा जिल्ह्यातील कनारखेड येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आज चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे. आमदार बच्चू कडू यांच्या आदेशान्वये हे आंदोलन केले जात असून खामगाव-अकोट या महामार्गावर मोठ्या संख्येने शेतकरी व प्रहार कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.
प्रहार चे जिल्हा उपाध्यक्ष निलेश घोंगे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.राज्यभरात आज प्रहार संघटनेने शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, ग्रामपंचायत कर्मचारी आणि अन्य घटकांच्या न्याय्य मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन पुकारले आहे.