दिंडोरी तालुक्यातील कसबे वणी येथे गणपती बनवण्यास प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्र सह गुजरात मधील गणेश उत्सव मंडळाचे कार्यकर्ते हे गणपती बुक करण्यात व्यस्त झाले आहेत. कळवण तालुक्यातील मोठे गणेश मंडळ हे गणपती घेण्यासाठी वणी येथे मूर्तिकार पवार यांच्याकडे येत असतात. याही वर्षी मोठ्या प्रमाणावर मोठे गणपती हे बुकिंग करण्यात आल्याचे मंडळाचे अध्यक्ष यांनी सांगितले.