गेले तीन-चार महिन्यापासून नागपूर विभागातील शालार्थ प्रकरण सातत्याने चर्चेत आहे, अशातच काही दिवसांपूर्वी नागपूर शिक्षण विभागातील काही वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. एसआयटी मार्फत तपास सुरू असतानाच ही कारवाई अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त करत अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघ यांच्या वतीने आजपासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन छेडण्यात आल आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक यांच्यासह इतर अधिकारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. बुलढाणा जिल्हा परिषद कार्यालयासमोर एकत्रित येत झालेल्या कारवाईचा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.