गोंदिया: दोन महिन्यात तब्बल २२२ तळीरामांवर कारवाई

गोंदिया: दोन महिन्यात तब्बल २२२ तळीरामांवर कारवाई
  • MG News
  • जुलै 23 2025

Share on  

दारू पिऊन वाहन चालवत असाल तर खबरदार!
 आता वाहतूक विभाग ॲक्शन म्हणून आला आहे. मागील दोन महिन्यात वाहतूक विभागाकडून तळीरामांवर कारवाई सुरू केली आहे. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या २२२ मद्यपी वाहनचालकांवर वाहतूक विभागाने कारवाई  केली असून, त्यांच्यावर दंड सुद्धा आकारण्यात आहे. या ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेमुळे मद्यपींची जणू झोपच उडाली आहे. त्याचप्रमाणे १४ अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई सुद्धा मागील सहा महिन्यात करण्यात आली आहे. त्याशिवाय त्यांच्या पालकांना सुद्धा आपल्या अल्पवयीन पाल्यांना वाहन देऊ नये. असे सुद्धा निर्देश वाहतूक विभागाकडून वतीने देण्यात आले आहे.

संबंधित बातम्या