गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.गोंदिया शहरातील अनेक भागांमध्ये नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. याच नुकसानग्रस्त भागाची पाहणी करिता भाजपचे आमदार विनोद अग्रवाल हे गेले होते.
या दरम्यान आमदार विनोद अग्रवाल यांनी स्वतः गुडघाभर पाण्यातून प्रवास करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या तर नागरिकांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी आमदार विनोद अग्रवाल यांनी दिले.